Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

आमदारांच्या राजीनाम्यावर विधानसभा अध्यक्षांनीच निर्णय घ्यावा – सर्वोच्च न्यायालय

Share

नवी दिल्ली : कर्नाटकातील राजकीय नाट्यावर पडदा पाडत १५ बंडखोर आमदारांच्या याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. या निर्णयामध्ये, न्यायालयाने असे म्हटले आहे की विधानसभा अध्यक्ष आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेतील. परंतु हा निर्णय घेण्यासाठी त्यांच्यावर कोणताही दबाव टाकण्यात येऊ नये. तसेच त्या आमदारांना विधानसभेत येण्यास सक्ती केली जाणार नाही.

दरम्यान या निर्णयामुळे १४ महिन्यापूर्वी स्थापन झालेल्या एचडी कुमारस्वामी यांच्या सरकारला जोरदार झटका बसला आहे. आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेत कर्नाटक विधानसभेला कॉंग्रेस-जेडी (एस) च्या बंडखोर आमदारांचा राजीनामा स्वीकारण्यास सांगितले होते. विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने बंडखोर आमदार, विधानसभा अध्यक्ष आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी केलेल्या याचिकांवरील सुनावणी मंगळवारी पूर्ण केली. बंडखोर आमदारांचे राजीनामे, त्यांना अपात्र ठरवण्याबाबत जैसे थे स्थिती ठेवावी असा आदेश पीठाने दिला होता तो कायम ठेवावा, अशी मागणी बंडखोर आमदारांच्या वतीने युक्तिवाद पूर्ण करताना ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी केली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!