आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्वोच्चपदी गीता गोपीनाथ यांची निवड

0

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्वोच्चपदी महिला नियुक्त होण्याची ही पहिलीच वेळ असून हा मान भारतीय महिलेला मिळालेला आहे. गीता गोपीनाथ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund) मुख्य अर्थतज्ज्ञपदी 1 जानेवारी 2019 रोजी रूजू झाल्या आहेत. गीता गोपीनाथ या म्हैसूरमध्ये जन्मलेल्या आणि सध्या हॉर्वर्ड विद्यापीठात शिकविणाऱ्या अर्थतज्ज्ञ आहेत.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुखपद याआधी रघुराम राजन यांनीही बजावले असून हा मान प्राप्त करणाऱ्या गीता गोपीनाथ या दुसऱ्या भारतीय आहेत.रघुराम राजन हे 1 सप्टेंबर 2003 ते 1 जानेवारी 2007 या काळात आंतरराष्ट्रीय नाणेनिधाच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी होते. गीता गोपीनाथ यांनी दिल्ली विद्यापीठातून 1992 साली बीए केलं आहे.दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठातून (1994) मध्ये तर वॉशिंग्टन विद्यापीठातून (1996) साली त्यांनी एमए केलं आहे.त्यांच्याकडे अमेरिकचं नागरिकत्व असून 2001 मध्ये त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली आहे.

गीता गोपीनाथ या अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यूच्या सहसंपादक आहेत. याशिवाय त्या राष्ट्रीय आर्थिक संशोधन संस्थेच्या सहसंचालिका देखील आहेत.तसेच गीता गोपीनाथ या सध्या हॉवर्ड विद्यापीठात आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था या विषयाच्या प्राध्यापिका आहेत.

LEAVE A REPLY

*