Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

माजी केंद्रीय मंत्री राम जेठमलानी यांचे निधन

Share

दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ९५ व्या वर्षी दिल्लीतील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान काही दिवसांपासून ते आजारी होते.

राम जेठमलानी यांची ओळख प्रसिद्ध क्रिमिनल लॉयर म्हणूनही होती. तसेच ते ‘बार काउंसिल ऑफ इंडिया’चे अध्यक्षपदाची जाबदारीही त्यांनी भूषवली आहे. भाजपचे राज्यसभा खासदार देखील होते.

वकिली करत असतांना तात्यांच्या काही केसेस प्रचंड गाजल्या आहेत. यामध्ये राजीव गांधी, इंदिरा गांधी यांची हत्येची केस, चारा घोटाळ्यातील लालू प्रसाद यादव यांची देखील केस लढवली आहे. याप्रमाणेच संसदेवर हल्ला करणारा अफजल गुरू ते सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणातील अमित शहा यांची केस राम जेठमलानी यांनी लढवली आहे.सध्या ते राष्ट्रीय जनता दलाकडून राज्यसभेवर खासदार होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!