Type to search

Breaking News maharashtra राजकीय

आम्ही आमचं बघू; सत्ता स्थापनेबाबत शिवसेना- भाजपाला विचारा – शरद पवार

Share
रामनाथ वाघ कृतिशील विचारांनी जगले- शरद पवार, Latest News Sharad Pawar Statement Ramnath Wagh Funeral Ahmednagar

मुंबई : सत्ता स्थापनेबाबत शिवसेना भाजपाला विचारा, त्यांनी निवडणुकांवेळी महायुती करून निवडणूक लढवली होती, आघाडीचं राजकारण आम्ही करू असा खोचक टोला शरद पवार यांनी शिवसेनेला लगावला आहे.

दरम्यान आज पासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झालेआहे. या संसदीय अधिवेशनासाठी शरद पवार दिल्लीला पोहचले. यावेळी पत्रकारांनी सत्ता स्थापनेबाबत प्रश्न विचारल्यानंतर पवारांनी सर्वांना चकित करणारे वक्तव्य केले आहे.ते म्हणाले कि, शिवसेना व भाजपने सत्ता स्थापनेबाबत विचार करावा, आम्ही का करू या वक्तव्यांनंतर पवारांची गुगली शिवसेनेला चांगलीच भोवणार असल्याचे दिसत आहे.

राष्ट्रपती राजवटीनंतर सत्ता स्थापनेची त्रिसूत्री तयार झाल्यानंतर शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी मध्ये बैठकी देखील होत आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नसतांना आता शरद पवारांच्या या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत, आणि शिवसेनेला जबरदस्त झटका दिलेला आहे. तर दुसरीकडे शरद पवार दिल्ली दरबारात सोनिया गांधींशी भेटणार असून सत्तेचं कोड भेटींनंतर उलगडणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!