Type to search

Breaking News टेक्नोदूत देश विदेश मुख्य बातम्या

‘चंद्रयान-२’ मोहिमेसाठी प्रथमच दोन महिला प्रमुख

Share

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) पहिल्यांदाच दोन महिला शास्त्रज्ञांची एका अंतराळ मोहिमेसाठी प्रमुख म्हणून नेमणूक केली आहे. रितू करिधल (मिशन डायरेक्टर) आणि मुथैय्या वनिता (प्रकल्प संचालक) ही त्यांची नावे आहेत.

येत्या १५ जुलैला ISRO च्या माध्यमातून चंद्रयान-२ मोहीम आंध्रप्रदेशाच्या श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित केली जाईल. या दोन महिला प्रमुखांपैकी रितू करिधल यांना ‘रॉकेट वूमन ऑफ इंडिया’ असंही म्हटले जाते. त्या मंगळयान मोहिमेच्या म्हणजेच ‘मार्स ऑर्बिटर मिशन’च्या डेप्युटी डायरेक्टरही होत्या. २००७ साली त्यांना माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते इस्रो यंग सायंटिस्ट पारितोषिक मिळाले.

एम. वनिता यांच्याकडे डिजाईन इंजिनिअरिंगची पदवी आहे. त्यांना अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाकडून २००६ साली बेस्ट वुमन सायंटिस्ट पारितोषिक मिळाले आहे. त्यांनी अनेक वर्ष उपग्रहांवर काम केले आहे.

चंद्रयान-२ ही अत्यंत महत्त्वाची अंतराळ मोहीम असून यात एक ऑर्बिटर आहे, एक ‘विक्रम’ नावाचे लँडर आहे आणि एक ‘प्रज्ञान’ या नावाचे रोव्हर आहे.  ३. ८ टन वजन असलेली चंद्रयान-२ या अंतराळ मोहिमेचा संपूर्ण खर्च हा ६०० कोटीपेक्षा अधिक असल्याचे म्हटले जात आहे. या मोहिमेद्वारे पहिल्यांदाच भारत चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे.

असे झाले तर चंद्राच्या पृष्ठभागावर लँड करणाऱ्या देशांच्या पंक्तीत भारताचा समावेश होईल. याआधी ऑक्टोबर २००८ मध्ये ISRO चंद्रयान-१ या यानाला चंद्रावर पाठवले होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!