Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

शहिद जवान मुलांच्या शिष्यवृत्तीत वाढ; मोदी सरकारचा पहिला महत्वाचा निर्णय

Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये पीएम किसान योजनेचा लाभ देशातील सर्व शेतकऱ्यांना दिला जाणार आहे तसेच पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेत वाढ करण्यात आली आहे.

नरेंद्र मोदी दुसरे पर्व सुरु झाल्यांनतर आज पहिल्यांदा कॅबिनेटची बैठक झाली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी शहिदांच्या मुलांना मिळणाऱ्या स्कॉलरशीपमध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच पीएम किसान या योजनेअंतर्गत महत्वाचा निर्णय घेतला गेला. या योजनेतील पात्र शेतकऱ्यांना ६००० रूपये देण्यात येतात.

मात्र कॅबिनेटने या योजनेवरच्या अटी शिथील केल्यामुळे देशातील १५ कोटी शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ होईल. याआधी पाच एकर शेती असलेल्या शेतकऱ्यांनाच याचा लाभ दिला जात होता.

दरम्यान या बैठकीत ‘पंतप्रधान स्कॉलररशीप योजने’त मोठे फेरबदल करण्यात आले असून दहशतवादी आणि नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांच्या स्कॉलरशीपमध्ये वाढ करण्यात आली आहे. यामध्ये मुलांची स्कॉलरशीप दरमहा २ हजार रुपयांवरून २५०० रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. तर, मुलींची स्कॉलरशीप २२५० रुपयांवरून ३००० रुपये करण्यात आली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!