Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन

Share

नवी दिल्ली | प्रतिनिधी

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षा शीला दीक्षित यांचे निधन झाले आहे. त्या 81 वर्षांच्या होत्या.  गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. आज सकाळी त्यांना अधिक त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना दिल्लीतील एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

शीला दीक्षित यांनी सलग तीन वेळा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या होत्या. दीक्षित यांच्या निधनामुळे दिल्ली काँग्रेसमधील मोठं नेतृत्त्व हरपले आहे.

दीक्षित यांच्या निधनाच्या बातमीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला. तसेच सर्वच पक्षीय नेत्यांनी त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर श्रद्धांजली अर्पण केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!