Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या निवासस्थानी ईडीचे छापे

Share

नवी दिल्ली : परकीय चलन विनिमय कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांतर्गत जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या मुंबई, दिल्लीस्थित निवासस्थान आणि कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे मारले आहेत.

दरम्यान जेट एअरवेज ही कंपनी १७ एप्रिल रोजी बंद पडली असून यामुळे अनेक कर्मचारी बेरोजगार झाले आहे. आता ईडीचे छापे पडल्याने गोयल यांच्या समस्यांमध्ये आणखी भर पडली आहे. परकीय चलन विनिमय अधिनियमातील (FEMA)तरतुदींच्या आधारे अतिरिक्त पुरावे गोळा करण्यासाठी ही छापेमारी करण्यात आली आहे.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या चौकशी अहवालात कंपनीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार असल्याचे आढळले. मार्च महिन्यात गोयल एअरलाइनच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाले. सध्या जेट एअरवेज दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!