Type to search

केंद्र सरकारचे खाते वाटप : कोणाला कोणते खाते? जाणून घ्या सविस्तर

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

केंद्र सरकारचे खाते वाटप : कोणाला कोणते खाते? जाणून घ्या सविस्तर

Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा भव्य शपथविधी सोहळ्यानंतर आज दुपारी खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. भाजपचे अध्यक्ष राहिलेल्या अमित शहांकडे यावेळी गृह मंत्रालयाचा कारभार सोपविला आहे तर निर्मला सीतारमन यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर तर राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण खातं सोपविण्यात आलं आहे.

शपथविधी सोहळ्यात नरेंद्र मोदींसह ५७ खासदारांनी शपथ घेतली. यामध्ये २४ कॅबिनेट मंत्री, ९ स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांचा समावेश होता. राजनाथ सिंह यांच्यानंतर डॉ. सुब्रमण्यन जयशंकर यांची परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

रमेश पोखरियाल निषांक – मनुष्यबळ विकास खाते, अर्जुन मुंडा-आदिवासी कल्याण खाते, स्मृती इराणी- महिला व बालकल्याण व वस्त्रोद्योग खाते, डॉ हर्षवर्धन -आरोग्य, विज्ञान तंत्रज्ञान व भूविज्ञान खाती, प्रकाश जावडेकर-पर्यावरण खाते,

पियुष गोयल -रेल्वे व कॉमर्स व इंडस्ट्री खाते, धर्मेंद्र प्रधान -पेट्रोलियम गॅस व पोलाद खाते, मुख्तार अब्बास नक्वी-अल्पसंख्याक खाते, प्रल्हाद जोशी -संसदीय कामकाज खाते व महेंद्रनाथ पांडे- कौशल्य विकास खाते अशा पद्धतीने खातेवाटप करण्यात आले आहे.

नरेंद्र सिंह तोमर यांची कृषी मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली असून स्मृती इराणी यांची महिला आणि बाल विकासमंत्री, नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते आणि परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाची धूरा रमेश पोखरियाल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

या कॅबिनेट मंत्रिमंडळात महाराष्ट्राला आठ मंत्रीपदे मिळाली असून शिवसेनेच्या डॉ. अरविंद सावंत यांना अवजड उद्योग खाते देण्यात आले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!