Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

मी राजीनामा दिलाय; नवा अध्यक्ष शोधा : राहुल गांधी

Share

नवी दिल्ली : मी अध्यक्षपदाचा राजीनामा देत असून पक्षाने लवकरच नवीन अध्यक्ष नेमावा अशी स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी दिले आहे. दिल्लीत पत्रकार परिषदेत त्यांनी हे सांगितले.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले कि, मी आता काँग्रेसचा अध्यक्ष राहिलेलो नाही. त्यामुळे पक्षाने तातडीने नव्या अध्यक्षाची निवड करावी, तसेच मी यापूर्वीच माझ्या पदाचा राजीनामा दिला असल्याने मी आता काँग्रेसचा अध्यक्ष नाही. म्हणून वरिष्ठांनी त्वरित निर्णय घेऊन काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक बोलवावी, असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभवामुळे राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. परंतु पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी हा राजीनामा नाम्नाजूर केला होता. मात्र, आपण निर्णयावर ठाम असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!