Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा

Share

नवी दिल्ली । काँग्रेसवरील पराभवाचं ग्रहण दूर करण्यासाठी आणि पक्षाला आलेली मरगळ झटकून नवी उभारी देण्यासाठी पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा देण्याचा निर्णय काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतला आहे. कार्यकारिणीत पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून सोनिया गांधी यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधी या पक्षाच्या हंगामी अध्यक्षा असतील अशी घोषणा केली.

कार्यकारिणीत राहुल गांधी यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली होती. सकाळी या बैठकीला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी उपस्थित होते. त्यानंतर अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेपासून आम्ही दूर राहणार असल्याचे सांगत सोनिया व राहुल बैठकीतून निघून गेले. त्यानंतर नेत्यांचे क्षेत्रवार 5 गट बनवून त्यात अध्यक्षपदासाठी विविध नावांवर चर्चा झाली. दरम्यान, रात्री 8 वाजता पुन्हा एकदा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली नव्याने कार्यकारिणीची बैठक सुरू झाली. या बैठकीला राहुल व सोनिया उपस्थित राहिले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!