Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

Video : अजब! चीनमध्ये पुलाखाली अडकलं विमान; अशी केली सुटका

Share

नवी दिल्ली : विमान म्हटलं कि हवाई सफर! अनेकदा या मार्गात अडथळा असला कि विमानाची लँडिंग विमानतळावर करतात. परंतु कधी हेच विमान पुलाखाली अडकल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का ? नक्कीच नसेल. पण चीनमध्ये ही अजब घटना घडली आहे.

खार तर हसू येईल पण हि घटना चीनमध्ये घडली असून या संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे विमान पुलाखालून जात असतांना अडकले आणि मग काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

पण झालं असं विमानातील काही भागापैकी एक महत्वाचा आणि मोठा भाग एका ट्रेलरवरुन नेला जात असताना पुलाखाली विमान अडकले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडीओत तुम्ही विमान पुलाखाली अडकल्याचं दिसत आहे. या परिस्थितीतून सुटका करुन घेण्यासाठी चालकाला ट्रेलरच्या टायरमधील सर्व हवा काढावी लागली. ड्रायव्हरच्या या कल्पनेमुळे विमानाची सुटका झाली अन ट्रेलर रवाना करण्यात आला.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!