मराठमोळे शरद बोबडे सरन्यायाधीशपदी विराजमान
Share

नवी दिल्ली : देशाचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून शरद बोबडे यांनी शपथ घेत आजपासून कार्यभार स्वीकारला. आज सकाळी न्यायाधीश शरद बोबडे यांचा शपथविधी पार पडला. यापूर्वी ४६ वे सरन्यायाधीश म्हणून काम पाहिलेले रंजन गोगई यांचा कार्यकाळ रविवारी संपला.
दरम्यान शरद बोबडे हे नागपूरचे असून चौथ्यांदा महाराष्ट्राला सरन्यायाशीधाचा मन मिळणार आहे. न्यायाधीश शरद बोबडे यांनी देशातील अनेक ऐतिहासिक आणि महत्वाचे निर्णय दिले आहेत. तर नुकत्याच सुप्रीम कोर्टाने सुनावलेल्या अयोध्या प्रकरणीच्या निकालावेळी सुद्धा त्यांचा रंजन गोगई यांच्या खंडपीठात सहभाग होता.
शरद बोबडे हे रंजन गोगई यांच्यानंतर पुढील सरन्यायाधीशाचे कार्यभार सांभाळणार आहेत. बोबडे यांनी १९७८ मध्ये काउंसिल ऑफ महाराष्ट्र मध्ये समील झाले. त्यानंतर बॉम्बे हायकोर्टच्या नागपूर बेंच मध्ये लॉ ची प्रॅक्टीस केली. १९९८ मध्ये वरिष्ठ वकिलांचा कारभार सांभाळला. तर २००० मध्ये त्यांनी बॉम्बे हायकोर्टात त्यांनी अतिरिक्त न्यायाधीशपदाचा कार्यभार स्वीकारला.
यानंतर ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले आणि २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. न्यायमूर्ती एस. ए. बोबडे २३ एप्रिल २०२१ रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.