Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

चांद्रयान २ : विक्रम लँडर सुस्थितीत; हार्ड लँडिंगमुळे तिरके उभे

Share

नवी दिल्ली : चांद्रयान २ मधील विक्रम लँडर सुस्थितीत असून फक्त थोड तिरक्या दिशेला झुकल्याची माहिती इस्रोतील एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. दरम्यान यामुळे पुन्हा एकदा इस्रोच्या अधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पुढील प्रक्रियेला गती मिळणार आहे.

चांद्रयान २ ची भारताने यशस्वीपणे पार पडली. शेवटच्या क्षणी चांद्रयान २ मधील विक्रम लँडर चा संपर्क तुटल्याने सर्वाची निराशा झाली. दुसऱ्या दिवशी (दि. ०८) रोजी विक्रम लँडरचे लोकेशन मिळवण्यात इस्रोला यश आल. आणि यामुळेच इस्रोला अधिकचे बळ मिळाले.

दरम्यान आज इस्रोच्या अधिकाऱ्याने सांगीतले कि, ऑर्बिटरच्या कॅमेऱ्याने जे छायाचित्र पाठवलं आहे, त्यानुसार निदर्शनास येते कि, विक्रम नियोजित स्थळाजवळ उभं असून ते सुस्थितीत आहे . परंतु चंद्राच्या पृष्ठभागावर ते थोडं तिरकस उभे आहे.

सॉफ्ट लैंडिंग’मध्ये लँडरला कमी वेगात उतरवले जाते. यामुळे लँडर, रोवर इतर उकरण सुरक्षित राहण्यास मदत होते. चांद्रयान  २ च्या आधी स्पेस संस्थांनी ३८ वेळा चंद्रावर ‘सॉफ्ट लैंडिंग’ करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये रूस, अमेरिका आणि  चीन या देशांना यश मिळाले आहे.

विक्रमसाठी सर्वात आव्हानात्मक होती. ‘सॉफ्ट लैंडिंग’ साठी  ‘रफ ब्रेकिंग फेज’ आणि ‘फाईन ब्रेकिंग फेज’ च्या माध्यमातून त्याचा वेग कमी केला जातो. इस्रोच्या पडद्यावर दिसणार्‍या आकडेवारीनुसार त्याचा ‘रफ ब्रेकिंग फेज’ यशस्वी झाला होता. परंतु काही अवधी शिल्लक असताना विक्रम लँडरशी संपर्क तुटला.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!