Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळीपूर्वीच दिवाळी; महागाई भत्त्यात पाच टक्यांनी वाढ

Share

नवी दिल्ली : यंदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच गोडधोड मिळणार असून मोदी सरकारने दिवाळीचे बंपर गिफ्ट दिलं आहे. कॅबिनेट बैठकीत झालेल्या निर्णयात कर्मचार्‍यांना ५% महागाई भत्ता वाढवून देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

दरम्यान या निर्णयामुळे देशभरातील केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्त्यात वाढ झाली असून १२% वरून १७% झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे देखील उपस्थित होते. त्यांनाही या निर्णयाची माहिती देत सांगितले कि, हा महागाई भत्ता जुलै २०१९ पासून दिला जाणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा फायदा देशातील सुमारे ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६२ लाख पेन्शर्स यांना होणार आहे. तसेच सरकारच्या या निर्णयामुळे तिजोरीवर सुमारे १६ हजार कोटी रूपयांचा भार पडण्याची शक्यता आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!