Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

मोदीजी अभिनंदन… सुषमाजींचे शेवटचे ट्विट

Share

नवी दिल्ली । सुषमा स्वराज आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाला नवा आकार देण्यासाठी कठोर मेहेनत घेतली. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी जगभरात अडचणीत सापडलेल्या भारतीयांना मदत केली. त्याचा शेकडो लोकांना फायदा झाला.

कोट्यवधींचे प्रेरणास्त्रोत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहताना म्हटले की, भारतीय राजकारणातील गौरवपूर्ण अध्यायाचा शेवट झाला. सुषमाजी गरिबासाठी जीवन देणार्‍या अद्वितीय नेत्या होत्या. त्यांच्या निधनामुळे पूर्ण भारत दु:खात आहे. त्या कोट्यवधी लोकांच्या प्रेरणास्त्रोत होत्या.

1977 मध्ये पहिली निवडणूक
सुषमा स्वराज यांनी 1977 मध्ये पहिली निवडणूक लढवली. त्यावेळी त्या 25 वर्षांच्या होत्या. त्या हरियाणातील अंबाला येथून निवडणूक जिंकून देशातील सर्वात युवा आमदार झाल्या. त्या हरियाणातील देवीलाल सरकारमध्ये मंत्री होत्या. सातवेळा लोकसभेच्या खासदार होत्या.

1998 मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री
1990च्या दशकात सुषमा स्वराज राष्ट्रीय राजकारणात आल्या. अटलजी सरकारमध्ये त्या मंत्री झाल्या. 1998 मध्ये अटलजी यांच्या कॅबिनेटमधून राजीनामा देत त्या दिल्लीच्या पहिल्या महिल्या मुख्यमंत्री झाल्या. मात्र, त्यानंतर त्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. त्या पराभवानंतर सुषमा स्वराज यांनी आमदारकीचा राजीनामा देत राष्ट्रीय राजकारणात आल्या.

बेल्लारीमुळे पुन्हा चर्चेत
1999 मध्ये सुषमा स्वराज बेल्लारीतून सोनिया गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 1996 मध्ये अटलजींच्या 13 दिवसांच्या सरकारमध्ये त्या केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री होत्या. 1998 मध्ये अटलजींचे सरकार आल्यावर पुन्हा त्या मंत्री झाल्या.

2014 ते 2019 परराष्ट्रमंत्री
2009 व 2014 मध्ये मध्य प्रदेशातील विदिशा लोकसभा मतदारसंघातून त्या निवडून आल्या. 2014 ते 2019 पर्यंत त्या परराष्ट्रमंत्री होत्या. प्रकृतीच्या कारणामुळे 2019 मध्ये त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.

आता ट्विटर सुने
तुम्ही जगात कुठेही असला सुषमा स्वराज यांना ट्विट केले की लगेच उत्तर मिळायचे किंवा तुमची अडचण सोडवली जात होती. ट्विटरवर त्या नेहमी अपडेट असायच्या. 370 कलम रद्द करण्याचे निर्णय लोकसभेत संमत होताच त्यांनी ट्विट केले. या दिवशाची मी प्रतिक्षा करत होते, असे त्यांनी लिहिले. परंतु त्यांचे हे ट्विट शेवटचे ठरले. आता ट्विटरवर सुने-सुने झाले.

स्वराज यांचा परिचय ………………………………………
– 14 फेब्रुवारी 1952 रोजी हरियाणाच्या अंबाला छावणीमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हरदेव शर्मा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते.
– अंबाला येथे सनातन धर्म कॉलेजमधून संस्कृत तसेच राज्यशास्त्रात पदवी घेतली.
– सर्वोच्च न्यायालयात त्यांनी वकिलीची प्रॅक्टिसही केली होती.
– पती स्वराज कौशल हे राज्यसभेचे सदस्य होते, त्याशिवाय मिझोरामचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले होते.
– 1977 मध्ये त्या हरियाणाच्या अंबाला छावणी विधानसभा मतदारसंघातून त्या पहिल्यांदा निवडून आल्या.
– 1979मध्ये वयाच्या 27व्या वर्षी हरियाणा जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षा बनल्या.
– मार्च-1998 मध्ये त्यांनी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री होत्या.
– 2009-2014 मध्ये त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या म्हणून काम पाहिले.
– 2014 मध्ये त्यांनी नरेंद्र मोदी सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री म्हणून काम पाहिले.

स्वराज यांची विक्रमी कारकिर्द …………………………….
– एखाद्या राज्याची सर्वात कमी वयात कॅबिनेट मंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला.
– वयाच्या 25 व्या वर्षीच हरियाणाच्या कॅबिनेट मंत्री बनल्या.
– भाजपच्या पहिल्या महिला प्रवक्त्या होत्या.
– भाजपच्या त्या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या.
– भाजपच्या पहिल्या महिला सरचिटणीस होत्या.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!