Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

#केंद्रीयअर्थसंकल्प२०१९ : ‘या’ व्यापाऱ्यांना मिळणार ५९ मिनिटात १ कोटी रुपयांचं कर्ज

Share

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात छोट्या उद्योगांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. देशातील उद्योजक तसेच छोट्या उद्योगांसाठी अवघ्या ५९ मिनिटात १ कोटी रुपयांचं कर्ज देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली आहे.

दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेला पूरक असणाऱ्या ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेप्रमाणेच छोट्या उद्योगांकडेही विशेष लक्ष देण्यात आले आहे. लघू उद्योजकांच्या कर्जात वाढ करण्यासाठी कर्जाच्या रकमेत वाढ करण्याची शिफारस बँकांनी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे केली होती.

त्यानुसार लघू उद्योगांसाठी ही रक्कम वाढवण्यात आली आहे. विशेष म्हणजे सीडबी, भारतीय स्टेट बँकेसहीत २१ राष्ट्रीय बँकांमधून हे कर्ज वितरीत केलं जाणार आहे.

या निर्णयामुळे देशातील नव उद्योजकांना नव संजीवनी मिळणार आहे. ज्यांनी नुकताच एखादा व्यवसाय सुरु केला आहे त्यासाठीही ही योजना लागू राहणार आहे. एमएसएमई सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. उद्योगांना प्रोत्साहन दिल्याने नोकऱ्यांचीही निर्मिती होणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!