अरुणाचल प्रदेशात ‘अरुणप्रभा’ नावाची वाहिनी सुरु

0

नवी दिल्ली : नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी अरुणाचल प्रदेश दौरा केला. या दौऱ्यादरम्यान विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी अरुणाचल प्रदेशासाठी स्वतंत्र अरुणप्रभा चॅनलची सुरवात करण्यात आली. यामध्ये अरुणाचल प्रदेशातील संस्कृती, परंपरा याचे चित्रीकरण करण्यात येईल.

‘अरुणप्रभा’ या नावाने ही वाहिनी ओळखली जाणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही वाहिनी सुरु करण्यात आली आहे. केंद्राच्या लूक इस्ट या प्रकल्पांतर्गत हि वाहिनी सुरु करण्यात आली आहे. याचे मुख्यालय इटानगर येथे आहे. यापूर्वी डीडी नॉर्थ इस्ट ही वाहिनी सुरु करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*