Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

अजबच ! दिल्लीतील प्रदूषणामुळे देवी-देवतांना घातला मास्क

Share

नवी दिल्ली : दिल्लीसह प्रमुख शहरांमध्ये वाढत्या वायू प्रदूषणामुळे बचाव करण्यासाठी नागरिक स्वतः बचाव करीत असतांना नागरिकांना आता देवतांच्या आरोग्याबद्दल चिंता वाटू लागली आहे. त्यासंदर्भात मंगळवारी काशी शहरातील सिगराच्या मंदिरात पुजारी हरीश मिश्रा यांच्या देखरेखीखाली देवी-देवतांना मास्क घालण्यात आला

दरम्यान दिल्लीसह काही शहरांमध्येही वायू प्रदूषण वाढले असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दिल्लीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संसदीय मतदारसंघ वाराणसीचे वातावरणही खालावले आहे. हवेच्या प्रदूषणामुळे संपूर्ण शहर धुक्याच्या चादरीने झाकलेले आहे. यामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे, तर अनेक मंदिरांमध्ये देवाला प्रदूषित हवेपासून वाचविण्याची व्यवस्था केली आहे. शहरातील काही मंदिरात देवाच्या मूर्तीला मास्क चढविण्यात आला आहे. प्रदूषणातून देवाला दिलासा देण्यासाठी मंदिर प्रशासनाने उचललेले हे पाऊल शहरातील चर्चेचा विषय ठरला आहे.

दिल्लीसह उत्तर प्रदेशातील बर्‍याच शहरांमध्ये प्रदूषणात वाढ झाली आहे. कानपूर आणि लखनऊ या शहरातही प्रदूषण वाढले आहे. त्याचबरोबर वाराणसीची परिस्थितीही अजूनही कायम आहे. प्रशासनाच्या सर्व प्रयत्नांना न जुमानता, हवेची गुणवत्ता निर्देशांक ४०० च्या आसपास आहे.

दरम्यान, शहरातील सिगरा येथील एका मंदिरात सर्व देवतांना मास्क घालण्यात आले आहे. या मंदिराचे पुजारी हरीश मिश्रा यांच्या नेतृत्वात हे पाऊल उचलण्यात आले. हे चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. देवाला प्रदूषणापासून वाचवण्याच्या या अनोख्या कल्पनेची शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. सोशल मीडियावरही लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!