Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

अमूल दूध दोन रुपयांनी महागले

Share

नवी दिल्ली : व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोधी यांनी अमूल दुधामध्ये दरवाढीची घोषणा केली आहे. यामध्ये त्यांनी किंमतीत दोन रुपयांनी वाढ केली आहे. मंगळवार म्हणजेच उद्यापासून (२१ मे ) ही दरवाढ लागू होणार आहे.

अमूल टोंड मिल्क ५०० मि.ली. पॅक आतापर्यंत २१ रुपयात मिळायचे त्यात एक रुपयांची वाढ होऊन २२ रुपयांना मिळेल. तर अमूलचे फूल २०० मि.ल क्रिम २८ रुपयांना मिळणार आहे. जे २७ रुपयांना मिळत होते.

अमूल डेअरीने दूधाचे खरेदी मुल्य वाढवले आहे. अमूलने म्हशीच्या १ लीटर दूधात १० रुपयांनी वाढ केली होती. तर १ लीटर दुधात ४. ५ रुपयांनी वाढ केली होती. खरेदी मुल्यात ही वाढ केल्याने सात लाख पशु पालकांना याचा फायदा होणार आहे.

पशु पालकांना वाढलेल्या किमतींचा फायदा १ मे पासून मिळण्यास सुरुवात झाली होती. त्यांना म्हैशीच्या एक लीटरच्या दुधासाठी ६४० रुपये गाईच्या दुधामागे प्रती लीटर २९० रुपये मिळू शकतील.

गुजरातची कोऑपरेटीव्ह मिल्क मार्केटींग फेडरेशन (जीसीएमएमएफ) अमूलच्या नावे डेअरी उत्पादनाचा व्यवसाय करते. फेडरेशनला सुरू आर्थिक वर्षात २०१९-२० मधील व्यवसाय २० टक्क्यांनी वाढून ४० हजार कोटी इतका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागच्या आर्थिक वर्षात जीसीएमएमएफने १३ टक्क्यांची वाढ करत ३३ हजार १५० कोटींचा व्यवसाय केला होता.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!