Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

पृथ्वीला २० टक्के ऑक्सिजन पुरवणारे ऍमेझॉन वनक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी

Share

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून अमेझॉन नदीच्या खोऱ्यातील जगातील सर्वात मोठं जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी सापडत आहे. या महाकाय वनक्षेत्राला आग लागल्याने यातील जंगलांचा बराचसा भाग भस्म झाला आहे. दरम्यान जागतिक स्तरावर यासंदर्भात भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान जगाचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनांमध्ये काही दिवसापासून वणवा पेटला असून संपूर्ण जगासाठी जवळपास २० टक्के ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या या वनक्षेत्रात हे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे भारतीय चित्रपट सृष्टीतील काही सेलिब्रिटींनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. यामध्ये अक्षय कुमार, आलीय भट्ट, रिचा चड्ढा, दिया मिर्झा यांनी ट्विटरवर पोंस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. वातावरणांत बदल होत असून ,मानवाने लवकरच याबाबत पाऊल उचलने गरजेचे असल्याने त्यांचे म्हणणे आहे.

तसेच काही नेटकऱ्यानी गुगलवर ताशेरे ओढले आहेत. अमेझॉनचे जंगल मागील काही दिवसांपासून जळत आहे. परंतु यासंदर्भात अद्याप गुगलने काहीच माहिती प्रसिद्ध केली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अमेझॉन फायर असे गुगलवर सर्च केले तर अमेझॉनची उत्पादनं आणि त्याची माहिती समोर येते. जगातील सर्वात मोठी इ कॉमर्स कंपनी असलेल्या अमेझॉनची उत्पादनं दाखवत असल्यानं युजर्स गुगलवर भ़डकले आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!