विमानात जन्म झालेल्या बाळाला ‘जेट एअरवेज’कडून आयुष्यभर विमानप्रवास मोफत

0
मुंबई | जेट एअरवेजच्या विमानात एका प्रवासी महिलेने विमानातच बाळाला जन्म दिला. ही महिला सौदी अरेबियातील दमाम ते कोची असा प्रवास करत होती.

या महिलेला प्रसूतीच्या वेदना होऊ लागताच विमानातील कर्मचाऱ्यांनी इमर्जन्सी घोषित करत विमान तातडीने जवळच्या म्हणजेच मुंबई विमानतळाकडे वळवले.

एक नर्स या विमानातून प्रवास करत होती. या महिला नर्सच्या मदतीने ही प्रवाशी महिला प्रसूती झाली. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.

हि घटना जेव्हा जेटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वांनाच समजली तेव्हा सर्वांसाठीच हा कुतूहलाचा विषय होता. बाळाच्या जन्माची आनंदाची बातमी ऐकून विमानातील प्रवासी आनंदित झाले. मुंबईत विमान आल्यावर या महिलेला आणि तिच्या बाळाला होली स्पिरीट रूग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, जेट एअरवेजने या बाळाला आयुष्यभराचा मोफत प्रवास देऊ केला असून तसा पासही भेट दिला आहे. त्यामुळे आता या बाळाला जेट एअरवेजने आयुष्यभरासाठी मोफत प्रवास करता येणार आहे.

LEAVE A REPLY

*