बँक खातेदारांना बसणार भुर्दंड; २० जानेवारीपासून नवीन नियम होणार लागू, वाचा सविस्तर

0
नवीन वर्षांत रिझर्व बँकेने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. येत्या २० जानेवारीपासून बँकेने नवीन दर लागू करण्याचा निर्णय घेतला असून याद्वारे बँकेला मोठे उत्पन्न मिळेल मात्र ग्राहकांचे खाते ऑटो डेबिटने खाली होणार आहे.

विशेष म्हणजे सर्व चार्जेस हे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) वगळून असल्यामुळे अधिक धडकी ग्राहकांना भरलेली दिसून येत आहे.

त्याचप्रमाणे बँकेच्या कर्मचारी, हिरे आणि प्लाटिनम ग्राहकांना  कुठल्याची प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली आहे.

अशा प्रकारात बँक ऑटो डेबिट प्रणालीने ग्राहकांच्या खात्यातून पैसे वजावट करेल.

१. पैसे काढताना…

२. खातेदाराला चेकद्वारे फक्त ५० हजार रुपये रक्कम काढता येईल. त्यासाठी १० रुपये प्रती व्यवहार द्यावे लागतील.

३. चेकद्वारे तिऱ्हाईत व्यक्तीला फक्त १० हजार रुपयांपर्यंत रक्कम काढता येईल. त्यासाठी ऑटो डेबिटनुसार खात्यातून १० रुपये वजावट करण्यात येईल.

४. रक्कम भरताना – जास्तीत जास्त फक्त २ लाख रक्कम एकाच वेळी सर्व प्रकारच्या बँक खात्यात भरता येतील.  त्यानंतर मात्र बचत खात्यासाठी जास्तीत जास्त ५० हजार रक्कमेला कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. मात्र पुढील ५० हजारांच्या रक्कमेला प्रतीहजार अडीच रुपये ट्रान्झाक्शन चार्जेस लागणार आहेत.

५. त्याव्यतिरिक्त चालू बँक खात्यासारख्या इतर प्रकारच्या बँक खात्यांना मात्र दरदिवशी २५ हजार रुपये रक्कमेला कुठलाही चार्ज लागणार नाही. त्यानंतर पन्नास हजारांपर्यंत मात्र अडीच रुपये प्रती हजाराला पैसे दरदिवशी आकारले जाणार आहेत. .

६. तसेच पासबुक अपडेट करण्यासाठी १० रुपये प्रती अपडेशन  चार्ज द्यावा लागणार असून ऑटो डेबिट प्रणालीने पैसे थेट खात्यातून वजा केले जातील.

७. खातेदारास बँकेचे स्टेटमेंट हवे असल्यास २५ रुपये ऑटो डेबिट प्रणालीनुसार वजा केले जातील.

८. नवीन चेकबुक पाहिजे असल्यास ऑटो डेबिटने खात्यातून   २५ रुपये वजा होतील.

९. सही तपासण्यासाठी आणि फोटो अटेस्टेडसाठी ५० रुपये रक्कम द्यावी लागेल.

१०. डीडी, पिओ(PO)/ECS साठी २५ ऑटो डेबिटने वजा होतील.

११. चेक वटवण्यासाठी १० रुपये आणि स्पीड क्लेरिंग चार्जेस ग्राहकाला मोजावे लागतील.

१२. पैसे / फंड ट्रान्स्फर करण्यासाठी (NEFT, RTGS, etc) दोन लाखांपर्यंत २५ रुपये मोजावे लागतील.

१३. व्याजाच्या प्रमाणपत्रासाठी ५० रुपये प्रती प्रमाणपत्र लागतील.

१४. संपर्क पत्ता आणि मोबाईल क्रमांक जोडणीसाठी २५ रुपये मोजावे लागतील.

१५. केवायसी अपडेशन साठी २५ रुपये मोजावे लागतील.

१६. पासपोर्टची नकल घेण्यासाठी ५० रुपये द्यावे लागतील.

१७. इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, इन्स्टा पिन, स्टार टोकन, पासवर्ड अनब्लॉक करण्यासाठी २५ रुपये तर मोबाईल आणि इंटरनेटच्या पासवर्ड बदल करण्यासाठी १० रुपये आकारले जातील.

LEAVE A REPLY

*