नवीन बजाज डिस्कव्हर बाजारात; नाशिकमध्ये आगाऊ बुकिंग सुरु

0
नाशिक ।  बजाज ऑटो तर्फे दोन नवीन दुचाकी वाहनांचे सादरीकरण नुकतेच मुंबईत करण्यात आले आहे. बजाज डिस्कव्हर 110 आणि डिस्कव्हर 125 वाहनांमध्ये नवीन जनरेशनला डोळ्यांसमोर ठेऊन अधिक अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. येणार्‍या ऑटो एक्पो प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर बजाजने हे दोन मॉडेल सादर केले असून येत्या महिनाभरात बजाजतर्फे आणखी चार मॉडले बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.

बजाज ऑटोतर्फे मुंबईत एका शानदार कायर्ंक्रमात डिस्कव्हर-110 आणि डिस्कव्हर-125 चे सादरीकरण नुकतेच करण्यात आली. नाशिकमध्ये अद्याप नवीन डिस्कव्हर दाखल झाली नसली तरी लवकरच ही गाडी दाखल होणार आहे. त्यासाठीची आगाऊ बुकिंग सुरु झाली असल्याची माहिती वासन बजाजचे धनंजय देशमुख यांनी दिली.

बजाजच्या डिस्कव्हर श्रेणीतील ही अत्याधुनिक आणि नवीन वैशिष्टांचा समावेश असलेली दुचाकी मोटरसायकल असेल. 2004 साली कंपनीने डिस्कव्हर सर्वप्रथम सादर केली. अत्यंत वाजवी दर आणि उत्तम रोड कामगिरीसह नवी स्टाईल ग्राहकांना भावली. त्यामुळे ही श्रेणी अधिक लोकप्रिय झाली.

आता डिस्कव्हर 110 पूर्णपणे नवीन बाइक असेल तर डिस्कवर 125 अपडेटेड बाइक असेल. कंपनीने या नव्या मोटरसायकलला अनेक कॉस्मॅटिक बदलांसह बाजारात आणली आहे. बजाजने डिस्कव्हर 110 या वाहनाची निर्मिती डायमंड सिंगल डाउनट्यूब फ्रेमवर तयार केली आहे. तिची स्टाइल ‘डिस्कवर 125’ मिळतीजुळती ठेवण्यात आली आहे.

बजाज ऑटो ने डिस्कव्हर- 110आणि 115 मध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण तांत्रिक बदल करुन तिला आधुनिकरित्या ‘टच’ देण्यात आला आहे. त्यामध्ये सिंगल-सिलेंडर, एयर-कूल्ड इंजिन बसवण्यात आले आहे. हे इिंंजन 8.5 बीएचपी पॉवर आणि 9.8 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. यातील इिंजनमध्ये 4-स्पीड गियरबॉक्स बसवण्यात आले आहेत. डिस्कव्हर-125 मध्ये 124 सीसीचे इिंजन बसवण्यात आले आहे. जे 5-स्पीड गियरबॉक्स सह देण्यात आले आहे. या इंजिनमध्ये 11 बीएचपी पॉवर आणि 11 एनएम पीक टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे.

कंपनीचे डिस्कव्हर 125 अत्याधुनिक वैशिष्टे समाविष्ट केली आहेत. ज्यामध्ये डबल लेड एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स आणि आकर्षक स्टाइल, नवीन ग्राफिक्स इतर नवीन वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. नव्या बाईकमध्ये सर्वोत्कृष्ट ब्रेकिंगसह रिफ्रेश स्टाइल देण्यात आली आहे.

बजाजचे नवे मॉडल लवकरच : बजाज ऑटोने डिस्कव्हरच्या या दोन नव्या मॉडेलचे सादरीकरण करुन आपल्या पूर्ण बाईक लाइन-अप ला ‘रिफ्रेश’ आणि ‘अपडेट’ केले आहे. कंपनीने डिस्कव्हर वाहनांच्या सादरकरण कार्यक्रमात कंपनीने प्लॅटिना, पल्सर, अव्हेंजर 220 आणि डॉमिनार- 400 याबद्दलची उत्सुकता नाहिसी करुन येत्या काळात हे नवीन 4 मॉडेल बाजारात सादर होतील अशी माहिती दिली.

नाशिकमध्ये बुकिंग सुरु : नाशिकमध्ये या वाहनांची उत्सुकता असून त्यांसाठी ग्राहकांनी बुकिंगही सुरु झाली आहे. बजाज डिस्कव्हर-110 आणि डिस्कव्हर-125 या वाहनांसाठी एक्स शोरूम किंमत अनुक्रमे 50 ंहजार 496 रु. आणि 53 हजार 491 रु. इतकी असेल.

प्रिमियम वैशिष्ट्यांसह रास्त दर : 100 सीसी क्षमतेच्या वाहन क्षमता श्रेणीत बजाजच्या प्लॅटिना कॉर्म्फोटेक आणि सीटी-100 ने आपला वेगळा प्रभाव बाजारात राखला आहे. नवीन डिस्कव्हर-110 आणि डिस्कव्हर-125 रास्त दरातील प्रमियम वैशिष्ट्यांसह बाजारात आणली आहे. नव्या तंत्रज्ञानाची सुविधा घेण्याची आवड असलेल्या ग्राहकांना ही वाहने नक्किच पसंत पडतील. याची इंजिन क्षमता आणि नवा स्टाईलिश लूकही ग्राहकांना नक्किच आकर्षित करेल.

– एरिक वास,  अध्यक्ष मोटारसायकल

LEAVE A REPLY

*