मालेगावी आज दिवसभरात १५ कोरोना पाॅझिटिव्ह; सिन्नरमध्ये रुग्ण वाढला; बाधितांचा आकडा ९१ वर

मालेगावी आज दिवसभरात १५ कोरोना पाॅझिटिव्ह; सिन्नरमध्ये रुग्ण वाढला; बाधितांचा आकडा ९१ वर

नाशिक | प्रतिनिधी

मालेगावमध्ये पुन्हा रात्री सायंकाळी मिळालेल्या आकडेवारीनुसार नवे १५ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.  शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७७ वर पोहोचली आहे. नाशिक शहरातही आज दिवसभरात ५ रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. तर सिन्नर तालुक्यात कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील इतर तालुक्यातील संख्या आता चारवर पोहोचली आहे.

आज मालेगाव शहरात दोन संशयितांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दोन्हीही संशयितांचे घशातील स्राव पुणे येथे  तपासणीला पाठवले आहेत. त्यांच्या अहवालाकडेदेखील प्रशासनाचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे वाढलेली बाधितांची संख्या चिंताजनक आहे.

नाशिक जिल्ह्यातील मधील आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या ९१ वर पोहोचली आहे. यामध्ये नाशिक शहरात १०  जिह्यातील चार तालुक्यांत चार आणि मालेगावमध्ये एकूण ७७ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. यात  मालेगावातील तरुणीचा मृत्यू धुळे येथे झाला आहे. तर आज दोन संशयितांचा मालेगावी मृत्यू झाला आहे.

आज कमालपुरा परिसरातील ३३ वर्षीय तरुणाचा जीवन हॉस्पिटलमध्ये तर ६५ वर्षीय वृद्धाचा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. दोन्ही रुग्णांचे स्राव पुणे येथे तपासणीला पाठवले आहेत. अद्याप दोन्हीही संशयितांचे अहवाल प्राप्त झालेले नाहीत.

मालेगावमधील आठ प्रतिबंधित भागासह इतर भागातून रुग्ण आढळून आल्यामुळे मालेगावची चिंता अधिक वाढली आहे. रात्रीच्या अहवालात वाढलेले पाच रुग्ण कुठल्या परिसरातील आढळून आले आहेत हे समजू शकलेले नाही.

आज आढळून आलेले १५  रुग्ण हे मालेगाव शहरातीलच आहेत. यामध्ये ५४ वर्षीय प्रौढ इस्लामाबाद परिसर, ५४ वर्षीय प्रौढ संगमेश्वर परिसर, ३२ वर्षीय तरुण मोतीपुरा परिसर, ५९ वर्षीय प्रौढ कुसुंबा रोड आणि १८ वर्षीय तरुण न्यू वार्ड परिसरातील असल्याचे समजते. तर इतर पाच बाधित कुठले आहेत हे समजू शकले नाही.

दुसरीकडे आज नाशिक शहरात आणखी पाच रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. यातील चार रुग्ण अंबड लिंक रोडवरील संजीवनगरमधील दोन दिवसांपूर्वी बाधित आढळून आलेल्या महिलेचे निकटवर्तीय असल्याची माहिती आहे. तर रात्री बाधित आढळून आलेला रुग्ण नाशिकरोड परिसरातील असल्याचे समजते.

नाशिक शहरात १० तर  जिह्यातील चार तालुक्यांत चार आणि एकट्या मालेगावात ७७ रुग्ण वाढल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९१ वर पोहोचली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com