देशात नव्या १०० विमानतळांचा विकास – अर्थमंत्री सीतारमण

देशात नव्या १०० विमानतळांचा विकास – अर्थमंत्री सीतारमण

टीम देशदूत : देशातील पायाभूत सुविधा वाढीस लागाव्या यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. या अंतर्गत देशात १०० नव्या विमानतळांचा विकास केला जाणार आहे.

यामध्ये आधुनिक रेल्वे स्थानके, विमानतळ, बस स्थानके, लॉजिस्टिक सेंटर बांधली जाणार असलायचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पीय भाषणात म्हणाल्या.

इंफ्रास्ट्रकचर कंपन्यांना त्यांच्या स्टार्टअपमध्ये तरुणांना जोडण्याचे आवाहन केले जाईल. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग, चेन्नई-बेंगळुरू एक्सप्रेस वे लवकरच पूर्ण केला जाईल असेही त्या म्हणाल्या.

6000 किमी महामार्गाचे परीक्षण केले जाईल तसेच देशात 2024 पर्यंत 100 नवीन विमानतळ तयार केली जातील. 24000 किमी ट्रेन इलेक्ट्रॉनिक बनविली जाईल.

तेजस ट्रेनची संख्या वाढविण्यात येणार असून ती पर्यटनस्थळांपर्यंत जाईल. मुंबई-अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेनचे काम वेगाने केले जाईल. जल विकास रस्ता वाढवण्यात येईल. हा मार्ग आसामपर्यंत वाढविण्याची योजना आहे. वाहतुकीत 1.70 लाख कोटी रुपये गुंतविले जातील अशा गोष्ण त्यांनी याप्रसंगी केल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com