नेट परीक्षेसाठी नाशिक केंद्र असूनही परीक्षार्थींची फरफड

नेट परीक्षेसाठी नाशिक केंद्र असूनही परीक्षार्थींची फरफड

कोहोर : गेल्या तीन वर्षांपासून नेट परिक्षासेसाठीचे नाशिक केंद्र म्ह्णून असले तरी यंदा परीक्षार्थी संख्या वाढल्याने जिल्ह्यातील अनेक उमेदवारांना शेजारील जिल्ह्यात परीक्षा द्यावा लागली.

.दरम्यान युजीसीकडून घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता परिक्षा(नेट) परीक्षा यंदा २ डिसेंबर ते ६ डिसेंबर पर्यंत घेण्यात आली. पुर्वी ही परिक्षा देण्यासाठी राज्यातील काही मर्यादित जिल्हे केंद्र म्हणून अस्तित्वात होते. त्यामुळे परिक्षार्थीना पुणे, औरंगाबाद, मुंबई, नागपूर या जिल्ह्यांच्या केंद्रावर जावून परिक्षा द्यावी लागत असे. परिक्षेसाठी दुसऱ्या जिल्ह्याच्या ठिकाणी जावून वेळ,पैसा,आदी खर्च व इतर समस्यांना उमेदवारांना नेहमी तोंड द्यावे लागत होते.

त्यासाठी मागील तीन वर्षापासून केंद्रातील युजीसीने यात बदल करत नेट परिक्षा देण्यासाठी राज्यातील काही जिल्ह्यांचा नव्याने समावेश केला. त्यामध्ये या परिक्षेसाठी नाशिक जिल्ह्याचाही समावेश नव्याने करण्यात आल्याने, नाशिक जिल्ह्यातील नेट परिक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये आंनद झाला होता.

पण हा आंनद एक वर्षापुरताच मर्यादित राहीला, आणि पुन्हा परिक्षार्थी उमेदवारांच्या माथी कपाळमोक्षचा शिक्का बसला. नेट परिक्षा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातच केंद्र मिळावा, म्हणून उमेदवारांने पंसती क्रमांक पहिला देवूनही स्वतःचा जिल्हा न मिळता नजिकचा जिल्हा दिला गेला. यामुळे परिक्षार्थी उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे.

परिक्षा केंद्र नाशिक दिलेला असतांनाही, युजीसीने पंसती क्रमांक दोन व तीन आदी पर्यायी जिल्ह्यांची परिक्षा केंद्र दिले गेली. त्यामुळे परिक्षार्थी उमेदवारांना दुसऱ्या जिल्ह्यातील परिक्षा केंद्र शोधणे कठीण बनले होते. तसेच आर्थिक भूर्दंडही मोठ्या प्रमाणात सोसावा लागला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com