नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले

0
काठमांडू – नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना शनिवारी सकाळी घडली असून हेलिकॉप्टरमध्ये ६ प्रवासी आणि १ वैमानिक असे सात जण होते. ‘ऑल्टिट्यूड एअर’ या कंपनीचे हेलिकॉप्टर एका रुग्णाला आणण्यासाठी समगौन येथे गेले होते. मात्र, उड्डाणाच्या काही वेळाने हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. हेलिकॉप्टर काठमांडूपासून ८० किलोमीटर अंतरावर कोसळले असून पावसामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. दुपारी हेलिकॉप्टर सापडले असून हेलिकॉप्टर नुवाकोट जिल्ह्यातील दुर्गम भागात कोसळले. सरकारी यंत्रणांनी प्रवाशांबाबत कोणतीही माहिती दिलेला नाही.

 

LEAVE A REPLY

*