Saturday, May 11, 2024
HomeUncategorizedनेहा कक्करच्या ‘याद पिया की आने लगी’ गाण्याची यूट्यूबवर धूम

नेहा कक्करच्या ‘याद पिया की आने लगी’ गाण्याची यूट्यूबवर धूम

बॉलिवूडची रिमिक्स क्विन बनलेल्या गायक नेहा कक्करचं याद पिया की आने लगी गाणं सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. या गाण्याच्या व्हिडिओलाही अनेकांची पसंती मिळत आहे. हे गाणं रिलीज होऊन जवळपास 20 दिवस झालेले असताना गाण्याला तब्बल 100 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

16 नोव्हेंबर रोजी टी-सीरिजच्या यूट्यूब चॅनेलवर याद पिया की आने लगी गाणं रिलीज झालं. रिलीज झाल्याच्या काही वेळात गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं. दोन दिवसांतच गाण्याला 22,069,416 वेळा पाहण्यात आलं होतं. आता या गाण्याने 3,572,822 या संख्येचा आकडा पार केला आहे. याद पिया की आने लगी गाण्याला नेहा कक्करने आवाज दिला असून दिव्या खोसला कुमारने यात अभिनय केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या