Type to search

मुख्य बातम्या हिट-चाट

नेहा धूपिया व अंगद बेदीला कन्यारत्न!

Share

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडी नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांना कन्यारत्न झाले आहे. नेहा आणि अंगदने काही महिन्यांपूर्वी कोणालाही कानोकान खबर न लागता गुपचूप लग्न केले होतं. विशेष म्हणजे लग्नाआधीच गर्भवती असल्याने हा विवाहसोहळा तडकाफडकी करण्याचा निर्णय घेण्यात आला हे नंतर समोर आलं.

खारमधील विमेन्स हॉस्पिटलमध्ये आज रविवारी सकाळी ११ वाजता या चिमुकलीचा जन्म झाला असून या चिमुकलीच्या आगमनामुळे सध्या अंगद आणि नेहाच्या घरी आनंदाचं वातावरण पसरलं आहे. इतकंच नाही तर घरी या नव्या पाहुण्याच्या स्वागताची तयारीदेखील सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.

नेहा धूपिया आणि अंगद बेदीने लॅक्मे फॅशन वीक 2018 मध्ये रॅम्पवॉक केला होता. बेबी बम्पसोबत तिचा हा पहिला रॅम्पवॉक होता. हा ट्रेंड करिना कपूरने सेट केला होता. नेहाने त्याचाच कित्ता गिरवला होता.  चार वर्षांपूर्वीच अंगदने नेहाला लग्नासाठी प्रपोज केले होते. पण तेव्हा नेहा कुण्या दुसºयासोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण हे रिलेशनशिप तुटल्यानंतर नेहा व अंगद यांची जवळीक वाढली आणि दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!