Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारकरोनाच्या संशयित रूग्णांचा अहवाल निगेटिव्ह

करोनाच्या संशयित रूग्णांचा अहवाल निगेटिव्ह

नंदुरबार – 

नंदुरबार येथील परदेशवारी करून परत आलेल्या कुटूंबातील दोघांना कोरेना व्हायरसचा संसर्ग झाल्याच्या संशयावरून नदुरबार जिल्हा रूग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. त्यांचा थुंकी व रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल निगेेटिव्ह आला असून दोघांनाही कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

नंदुरबार शहरातील दोन महिला आणि एक पुरूष सौदीअरबीयातून शहरात दोन दिवसापुर्वी परत आला होता. त्यानंतर त्या पुरूषाला खोकला आणि सर्दीचा त्रास झाल्याने त्याला संशयीत म्हणून जिल्हा रूग्णालयात तयार करण्यात आलेल्या कक्षात ठेवण्यात आले. यातील पुरूषाचे नमुने संकलीत करून तातडीने पुणे येथील नॅशनल व्हायरोलॉजी इन्स्टीट्यट या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.

त्यानंतर आज दि. 12 मार्च रोजी त्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यात दोघ रूग्णांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनासह जिल्हावासीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. यावेळी माहिती देतांना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी सांगितले की, कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीमुळे नागरिकांनी घाबरुन न जाता खबरदारी घ्यावी, प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन कोरोनावर मात करता येऊ शकते, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून जिल्हा प्रशासनाने सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालयात सहा बेडच्या स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कोरोना विषाणूची जगातील व देशभरातील प्रसाराची सद्यस्थिती पाहता या विषाणूला प्रतिबंध घालणे अतिशय महत्वाचे आहे. यासाठी विषाणूमुळे होणार्‍या आजाराचा प्रसार, प्रतिबंध व उपचार याबाबत सर्वसामान्यामध्ये जनजागृती करणे महत्वाचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या