सीबीएसईच्या घोळामुळे ‘नीट’च्या 200 विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

0
नाशिक : मेडीकल प्रवेशासाठी अत्यावश्यक मानल्या जाणारया नीट परिक्षेचे रविवारी आयोजित करण्यात आली आहे.

या परिक्षेत परीक्षार्थींच्या प्रवेशपत्रावर चुकीचा पत्ता दिल्याने विद्यार्थ्यांची मोठया प्रमाणात तारांबळ उडाली. सीबीएसईच्या घोळामुळे सुमारे 150 ते 200 विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

येथील विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर मुंढेगाव असा उल्लेख करण्यात आल्याने सकाळी अनेक विद्यार्थी ईगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे पोहोचले.

सकाळी 9.30 वाजता परिक्षा सुरू होणार होती. परंतु त्या ठिकाणी कोणतेही परिक्षा केंद्र नसल्याने विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना धक्काच बसला.

अखेर त्यांनी धावपळ करुन पत्यातील इतर सुचनांनुसार पेठरोडचे एकलव्य स्कूल येथील परीक्षा केंद्र गाठले. गोंधळामुळे त्यांना केंद्रावर पाहोचण्यास उशीर झाला. सीबीएसईच्या या अंधाधुंद कारभारावर पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

*