#NEET Exam: ‘नीट’ परीक्षेसाठी सीबीएसईने दिला ड्रेसकोड

0
देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीबीएसईची ‘नीट’ ही प्रवेशपूर्व परीक्षा 7 मे रोजी होणार आहे.
देशभरातील 103 केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून यंदा इंग्रजीसह अन्य नऊ प्रादेशिक भाषांमध्येही ही परीक्षा देता येणार आहे.
यामध्ये हिंदी, इंग्रजी, आसामी, बांगला, गुजराती, मराठी, कन्नड, ओडिया, तमिळ आणि तेलुगूचाही समावेश आहे.

कॉपीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठीही सीबीएसईने अनेक नियम बनवले आहेत.

सीबीएसईने ड्रेसकोडसह अनेक दिशानिर्देश जारी केले असून त्यांचे पालन केल्यास परीक्षेपासून वंचित राहावे लागू शकते.
विद्यार्थ्यांनी काय घालावे, सोबत काय आणावे आणि काय नाही, सीबीएसईने  याविषयी सल्ला दिला आहे.

कपड्यांबाबत विशेष सूचना:
नीट परीक्षेसाठी सीबीएसईने विद्यार्थ्यांनी परिधान करावयाच्या कपड्यांबाबत कठोर नियम बनवले आहेत. विद्यार्थिनी परीक्षेत साडी घालून तसेच मेंदी लावून येऊ शकणार नाहीत. विद्यार्थ्यांना हवाई चप्पल किंवा सँडल, हाफ बाह्यांचे टी-शर्ट किंवा शर्ट, ट्राऊझर, लेगिंग्स, लोवर, प्लाझो, हाफ बाह्याची कुर्ती, टॉप घालता येईल. मोठ्या बटणाचे किंवा फुलांचे चित्र असलेल्या कपड्यांवर बंदी आहे.

परीक्षेसाठी विवाहित महिलांना मंगळसूत्र घालण्याची परवानगी आहे. मात्र, बुरखा किंवा साडी परिधान करता येणार नाही. ताईत, ब्रेसलेट, कृपाणसारख्या वस्तू जवळ बाळगता येणार नाहीत.

नीटसाठी खास पेन
नीटसाठी सीबीएसईने खास पेन तयार केला असून परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्र दाखवल्यानंतर हा पेन विद्यार्थ्याला दिला जाईल.

यंदा 41 टक्के अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी
यंदा नीट परीक्षेसाठी 11,35,104 विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. मागच्या वेळी 8,02,594 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता.

LEAVE A REPLY

*