#NEET : ‘नीट’च्या परीक्षेचे निकाल जाहीर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

0

काही दिवसांपूर्वी मद्रास हायकोर्टाने नीटचे निकाल जाहीर करण्याला स्थगिती दिली होती.

या प्रकरणाची पुढील सुनावणी होईपर्यंत नीटचे निकाल राखून ठेवले जावेत, असे हायकोर्टाने म्हटले होते.

या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून आजच्या सुनावणीदरम्यान ही स्थगिती उठवण्यात आली.तसेच नीट परीक्षेचा निकाल तात्काळ म्हणजे आजच्या आज जाहीर केले जावेत, असे आदेशही सीबीएसई बोर्डाला दिले.

सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

*