Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : सच्चा शिवसैनिकाला माघार घ्या सांगण्याची गरज नाही – नीलम गोऱ्हे

Share

नाशिक | प्रतिनिधी 

राज्यात ६३ आमदार असलेल्या शिवसेनेला १२४ जागा मिळतात तर भाजपच्या १२३ आमदार असताना त्यांना १४६ जागांवर समाधान मानून युती करून आगामी निवडणुकांना सामोरे जागे लागते आहे. यावरून शिवसेनेच्या आमदारांच्या कामावरचा विश्वास आहे. युती झाल्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवार नाराज झाले, कार्यकर्ते नाराज झाले आहेत. मात्र, शिवसेना प्रमुखांनी सांगितलेला शब्द अन्य झाला तर सहन करून नका त्याच्या विरोधात आवाज उठवा पण निर्णय विचारपूर्वक घ्या असे आवाहन आज शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांना दिले.

त्या माध्यमांशी संवाद साधत होत्या. त्या म्हणल्या की, राज्यात अनेक शहरात शिवसेनेला अधिक जागा मिळाल्या आहेत. नाशिकमध्ये जरी जागा शहरात नसतील तरी ग्रामीणमध्ये आमच्या जागा अधिक आहेत. कार्यकर्त्यांनी वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. कार्यकर्त्यांनी काम करण्याची तयारी ठेवा असेही गोऱ्हे यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या की, राज्यात शिवसेनेला ६३ जागा आहेत. तरीदेखील आपण १२४ जागांवर लढत आहोत. कामावर विश्वास आहे; त्यामुळेच हे शक्य झाले आहे.

आज भाजपचे राज्यात १२३ आमदार आहेत परंतु युतीसाठी त्यांनीही नरमाईची भूमिका घेऊन १४६ जागा घेत समाधान मानले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी वाईट वाटून घेऊ नये.

सोमवारी (दि. ७) रोजी माघारीचा दिवस आहे तेव्हा चित्र स्पष्ट होणार आहे. शहरात नाही मात्र ग्रामीण भागात शिवसेनेला जास्त जागा आहेत. यावर शिवसैनिक विचार करतील. विचारपूर्वक निर्णय कार्यकर्ते घेतील अशी अपेक्षा आहे.

तसेच सच्चा शिवसैनिकांना माघार घ्या असे सांगण्याची गरज भासणार नाही असेही सांगत गोऱ्हे यांनी बंडाळी पुकारलेल्या शिवसैनिकांना माघार घेण्याचे आवाहनच करून टाकले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!