Type to search

नंदुरबार

कोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने

Share

शहादा । ता.प्र. – गेल्या सात आठ महिन्यापासुन कोळदे ते खेतिया रस्त्याचे काम सुरु आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी अपेक्षा प्रवाशांकडून होत आहे. एकीकडे भारत देश प्रगतीकडे वाटचाल करत असताना विविध योजनेअंतर्गत महामार्ग, आंतरराष्ट्रीय महामार्ग, रस्ते तयार होत आहे. ही चांगली बाब असली तरी हे रस्ते बनविताना ठेकेदाराने रस्त्यावर अपघात टाळता येण्यासाठी उपाययोजना करणे तेवढेच गरजेचे आहे.

खेतिया-कोळदे रस्त्यावर ब्राम्हणपुरीजवळ रस्ता बनविताना पर्यायी रस्ता नसल्याने रहदारी ठप्प होते. मोठमोठ्या रांगा लागतात. शिवाय हा मार्ग दोन राज्याच्या सिमांना जोडणारा असल्याने प्रवासी व वाहनांची संख्या जास्त आहे. हा नेहमीच वर्दळीचा असतो. रस्ता काम सुरु असल्याने व पर्यायी रस्ता न केल्याने वाहन धारकाना मोठे वाहन पास करतांना मोठी कसरत करावी लागते. चढ उतार असल्याने अवजड वाहन, बससारख्या वाहनांना कसरत करावी लागते. वाहन चालकास जीव मुठीत धरुन वाहन हाकावे लागते. यामुळे दोन दिवसापुर्वी ऑइलने भरलेला ट्र्क याच ठिकाणी उलटला होता. सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही. पर्यायी रस्ता व्यवस्थित केला तर होणारे अपघात व रस्त्यावरील वाहनाचा रांगा लागणे थांबून प्रवाश्यांचा प्रवास सुखकर होइल. त्यामुळे पर्यायी रस्ता करावा अन्यथा रस्ता लवकरात लवकर व्हावा अशी मागणी प्रवाशी व वाहनधारक करत आहेत.

शिवाय हा महामार्ग होत असताना ठिकठिकाणी गतिरोधक बसविणे आवश्यक आहे. गेल्या वर्षभरात याच रस्त्यावर अपघात होवून कितीतरी जणाना आपला जीव गमवावा लागला आहे. काही दिवसापुर्वी कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा.अनिल देशमुख, दोन दिवसापुर्वी सुरवानी ता.धडगाव येथील युवक हिरालाल पाडवी यांचा अपघातात मृत्यू झाला. जागोजागी गतिरोधक बसविले तर संभाव्य अपघात टळतील. त्यामुळे ठेकेदाराने गतिरोधक बसवावेत अशी मागणी आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!