Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

जिल्हा बँकेने वसुली थांबवावी अन्यथा पालकमंत्र्यांना घेराव

Share

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात दुष्काळाची भयाण परिस्थिती असून जिल्हा बँक शेतकर्‍यांकडून सरसकट कर्ज वसुली करत आहेत. जिल्हा बँकेकडून सावकारी पध्दतीने सुरु असलेली कर्ज वसूली तत्काळ थाबवा अन्यथा पालकमंत्र्याच्या निवासस्थानावर धडक देऊन घेराव केला जाईल, असा इशारा नाशिक जिल्हा विविध विकास सेवा सहकारी फेडरेशनने दिला आहे.

फेडरेशनच्या सदस्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची आज (दि.10) भेट घेत त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. मागील दोन वर्षांपासून जिल्हा बँक अडचणीत आली आहे. त्यामुळे जिल्हयातील 1100 विकास सोसायटया आर्थिक अडचणीत आल्या आहेत. नोटाबंदीमुळे अडचणी भर पडली आहे.

त्यावर तोडगा म्हणून जिल्हा बँक शेतकर्‍यांना वसूलीसाठी नोटीसा धाडून त्यांच्या जमिनीचा लिलाव करत आहेत. मात्र, दुसरीकडे शेती वगळता इतर उद्योग व संस्थांना दिलेल्या कर्जाची वसुली केली जात नाही. अशा मोठ्या थकबाकीदारांवर बँकेने कारवाईचा बडगा उगारावा.

दुष्काळामुळे शेतकरी संकटात आला असून बँकेने वसुलीची कारवाई त्वरीत थांबवावी ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच, अडचणीच्या परिस्थितीतून सावरण्यासाठी शिखर बँकेने अडीच हजार कोटींचे कर्ज तत्काळ जिल्हा बँकेला उपलब्ध करुन द्यावी,अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

जिल्हा बँकेने मनमानी कारभाराला लगाम न लावल्यास पालकमंत्र्यांना घेराव घातला जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डोखळे, कार्याध्यक्ष राजू देसले, सरचिटणीस विष्णूपंत गायखे, उपाध्यक्ष सपंतराव वक्ते, उत्तम खांडबहाले आदी उपस्थित होते.

प्रमुख मागण्या

  • शेतीचा लिलाव थांबवाव
  • मुदत ठेवी कर्जात रुपांतर चालू ठेवावे
  • थकबाकी नसलेल्या संस्थांना कर्जपुरवठा करावा
  • शासनाने दिलेली मदत शेतकर्‍यांना तत्काळ मिळावी
  • विकास सोसा. वाचविण्यासाठी शासनाने मदत करावी
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!