नोटाबंदीच्या काळातील 342 कोटी स्वीकारा अन्यथा राजीनामे घ्या – नरेंद्र दराडे

0
नाशिक : नोटाबंदीच्या काळातील 342 कोटी स्वीकारण्यात यावेत अन्यथा राजीनामे घ्या असा पवित्रा नाशिक जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी घेतल्यामुळे जिल्हा बँकेच्या प्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तविली जात असून राज्य सरकार काय भूमिका घेते याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.

दुसरीकडे मात्र शिक्षकांचे पगार, लाईट बिल आणि दिलेली कर्जप्रकरणे यातील काही प्रकरणे नाशिक जिल्हाबँक पदाधिकाऱ्यांच्या अंगलट येतील म्हणून ते आता राजीनाम्याची भाषा करत असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार वेळेत न केल्यामुळे शिक्षकांच्या रोषाला बँक अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना सामोरे जावे लागले.

एकीकडे जिल्हा परिषद बँकेवर कारवाई करण्याच्या तयारीत असतांना दुसरीकडे महावितरणनेदेखील जिल्हा बँकेला धारेवर धरले आहे.

त्यामुळे जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी आता राजीनाम्याचा इशारा सरकारला दिल्यामुळे काहीतरी तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

LEAVE A REPLY

*