Wednesday, April 24, 2024
Homeक्रीडानाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेमार्फत खेळाडूंसाठी आँनलाईन योगा शिबिर

नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेमार्फत खेळाडूंसाठी आँनलाईन योगा शिबिर

नाशिक । करोना लाँकडाऊन काळात मैदानावरील सरावाचा अभाव असल्याने शाररिक तसेच मानसिक क्षमता वाढिसाठी जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने खेळाडुंसाठी आँनलाईन योगा प्रशिक्षणास १ जुनापासून सुरुवात करण्यात आली आहे.
आयुष मंत्रालय प्राधिकृत  योगा प्रशिक्षक दीप्ती शेखर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली  1 जून पासून 21 जून पर्यंत क्रिकेट खेळाडूंना  झूम अॅप च्या माध्यमातून ऑनलाइन योगा प्रशिक्षण सुरू करण्यात आले.नाशिकचे उदयोन्मुख 50 खेळाडू शिबिरात सहभागी झाले आहेत.
कोविड १९ मुळे सध्या लॉक डाऊन असल्याने मैदानावर क्रिकेट चा सराव आणि सामने खेळता येत नाहीत. सर्व खेळाडू घरीच शारीरिक तंदुरुस्ती साठी व्यायाम करत आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून नाशिक संघाचे फिटनेस प्रशिक्षक विनोद यादव यांनी दिलेल्या फिटनेस धोरणाप्रमाणे खेळाडूनी  फिटनेस केला.
रणजीपटू मुर्तुजा ट्रंकवाला याच्या कल्पनेतून क्रिकेट खेळाडूंना मानसिक एकाग्रता व सकारत्मकता यावी या दृष्टिकोनातून योगा प्रशिक्षण देणे बाबत चर्चा झाली. त्यानुसार  दीप्ती गवळी यांच्या योगा प्रशिक्षण वर्गास सुरुवातब झाली असुन यामध्ये योगासने,प्राणायाम, ध्यान धारणा,  ताण व्याव्यस्थापणचा समावेश आहे.
योगा अभ्यासातून विशेषतः सजगता, एकाग्रता, निर्णय क्षमता, जलद प्रतिक्रिया इत्यादी गोष्टींचा विकास झाल्याने खेळातील अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते. जरी काही दुखापत झाली तरी योगामुळे सहनशिलता वाढलेली असते. तसेच मानसिक सकारात्मकता निर्माण होते. रोग प्रतिकार शक्ती वाढते.
या शिबिरात खेळाडूंची लवचिकता, चापल्य दम क्षमता, प्रतिक्षिप्त क्रिया, एकाग्रता, निर्णयक्षमता, खेळाडू वृत्ती, खेळातील इजा व बरे  होणे या गोष्टीवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. 21 जून रोजी जागतिक योगा दिनाचे निमित्त साधून या प्रशिक्षण शिबिराचा समारोप करण्यात येणार आहे.
- Advertisment -

ताज्या बातम्या