नाशिक जिल्ह्यात गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसचे निदर्शने

0
नाशिक | गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने तालुकानिहाय आंदोलन करण्यात आले.  जिल्ह्यातील बागलाण, नांदगाव, कळवण, त्र्यंबक, निफाड, सिन्नर तालुक्यात आंदोलने झाली.

गॅस सिलेंडर चे भाव वाढल्याने सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे. केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ केली असून, गेल्या तीन महिन्यातील ही तिसरी दरवाढ आहे. सत्ताधारी भाजप- शिवसेना युती सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. महागाई चे चटके सर्वाधिक महिलांना सोसावे लागत आहेत.

गॅस दरवाढ झाल्याने नक्की कोणाला ‘अच्छे दिन’ येणार आहेत हे सरकारने जनतेला सांगावे असा सवाल राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी केला आहे.

नाशिक तालुक्यात भगूर येथे आंदोलन करण्यात आले. गॅस सिलेंडरचे भाव वाढल्याने महिलांनी चूल पेटवून स्वयंपाक करत सरकारचा तीव्र निषेध केला. ‘मोदी तेरे राज मे, जनता बुरे हाल मे,’ ‘केंद्र सरकार हाय हाय,’ ‘मोदीजी का देखो खेल महंगा सिलेंडर, महंगा तेल’ अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.

त्यानंतर गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली आणि परिवर्तन करत या अंतयात्रेला महिलांच्या वतीनेच खांदा देण्यात आला.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष भारती पवार, सायरा शेख, माधुरी गायधनी, वैशाली देवगिरे, भारती साळवे, सुशीला बलकवडे, सुलताना शेख, मंगल भालेराव, मंद कदम, रंजना बोधडे, संगीता झांजरे, रुपाली व्यवहारे, शांताबाई बागुल, पूनम बर्वे, पूजा डावरे, संगीता उमाप, सुषमा गायकवाड, आनंद झांजरे, राहूल भालेराव,गणेश दोंदे, सचिन चौधरी, निखील अहिरे, हरीश कनकुटे, आदींसह असंख्य महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

*