Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने दिला आंदोलनाचा इशारा

Share

कोपरगाव-कोल्हार रस्ता दुरुस्त न करताच टोल चालू केल्याच्या निषेधार्थ

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – नगर-मनमाड राज्य महामार्गावरील कोल्हार ते कोपरगाव रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून भाविकांना शिर्डीत येताना आपला जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे हे खड्डे प;र्णपणे बुजविण्यात यावेत अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा अमोल बाणाईत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात दिला आहे. याअगोदर शिवसेनेने रस्ता दुरुस्त न झाल्याच्या निषेधार्थ टोलनाक्यावर आंदोलन छेडले होते. आता त्यापाठोपाठ हा रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून शिर्डी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेनेही आंदोलनाचा इशारा दिला आहे.

दरम्यान जागतिक तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी नगरीत येताना कोपरगाव ते कोल्हार या महामार्गावर प्रचंड खड्डे पडले आहे. यामुळे काही निष्पाप जिवांचा बळी गेला आहे. आजही भाविकांना या ठिकाणी येण्यासाठी आपला जीव मुठीत धरून यावे लागत आहे. या रस्त्याचा टोल सुप्रीम कंपनी वसूल करत आहे. खड्डे न बुजवता टोल वसुली ही निषेधार्ह बाब आहे.

सद्यस्थितीत खड्डे थातुरमातुर बुजविण्याचे काम बंद करून पूर्णपणे बुजवावेत, अन्यथा आंदोलन छेडणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर, उप तालुकाध्यक्ष सुधाकर शिंदे, ज्येष्ठ नेते बाबासाहेब कोते, शहराध्यक्ष महेंद्र शेळके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव निलेश कोते, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष राकेश कोते, शहराध्यक्ष दिपक गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक शेळके, विशाल कोते, गणेश गोंदकर, विशाल भडांगे, प्रसाद पाटील, अल्पसंख्याक सेलचे समीर शेख आदींनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला आहे.

टोलनाका व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा चेंडू अप्पर पोलीस अधीक्षकांच्या दालनात
कोपरगाव-कोल्हार रस्ता दुरुस्त केल्यानंतर टोल वसुली करावी, अशी मागणी करत शिवसेनेने खासदार सदाशिव लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन छेडले होते. मात्र त्यांचे आंदोलन फोल ठरवीत तीनच दिवसात टोल पुन्हा रस्ता दुरुस्त न करता सर्रासपणे सुरू करण्यात आला. त्यानंतर खा. सदाशिव लोखंडे यांनी टोल व्यवस्थापनाचा निषेध करत गांधीगिरी करुन आंदोलन केले व व्यवस्थापनाविरुद्ध पोलीस उपअधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज दिला. मात्र पोलीस प्रशासनाने या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे आता खा. लोखंडे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे टोल व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक यांना साकडे घालणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!