Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

अंधश्रध्देच्या मागे जाऊ नका – शरद पवार

Share

तबलिगी कार्यक्रमाला परवानगी देण्याची गरज नव्हती
मुंबई – 11 एप्रिलला महात्मा फुले यांची जयंती आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला ज्ञानाचा, एकतेचा संदेश दिला. त्यावेळी ज्ञानाचा दिवा लावून एक दिवा ज्ञानाचा या प्रकारचा संदेश देण्यासाठी योग्य दिवस आहे. 14 तारखेला बाबासाहेबांची जयंती आहे. महिनाभर आपण ती साजरी करतो. आपण एक दिवा संविधानाचा लावून जयंती साजरी करुया. उत्सवाचं स्वरुप येणार नाही याची खबरदारी घेऊयात, गर्दी टाळूया. अंतर राहील याची काळजी घेऊया आणि सर्व परिस्थितीवर मात करुयात, असं पवारांनी म्हटलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही अंधश्रद्धेला समर्थन दिलं नाही. कधीही अंधश्रद्धेच्या मागे जाऊ नका. अंधश्रद्धेचं समर्थन करु नका असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यतून जनतेशी संवाद साधला. शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर येऊ नये असेही ते म्हणाले.

पवार म्हणाले की, सध्याच्या घडीला देशात 4000 पेक्षा जास्त कोरोनाच्या केसेस आहेत. तसेच 118 मृत्यू झाले आहेत. 328 रुग्ण बरे होऊन घऱी गेले आहेत. हे प्रमाण दुर्लक्ष करण्यासारखं नाही. कोरोनाचा रुग्ण बरा होऊ शकतो ही स्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे सूचनांचं पालन केलं पाहिजे. ही आजची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. या सगळ्या स्थितीत एकत्र राहण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत कटुता, संशय वाढेल अशी स्थिती निर्माण होऊ न देण्याची गरज आहे. तबलिगी जमातच्या कार्यक्रमावर बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की, खरं तर अशा परिस्थितीत कार्यक्रम घेण्याची गरज नव्हती. त्यांना परवानगी देण्याची गरज नव्हती.

महाराष्ट्रात कार्यक्रम घेण्यासाठी विनंती करण्यात आली होती. पण आपल्याकडे ती परवानगी नाकारण्यात आली. दिल्लीतही महाराष्ट्राप्रमाणे परवानगी नाकारली असती तर टीव्हीवरुन वारंवार एखाद्या वर्गाला, समाजाच्या संबंधी एक चित्र मांडून सांप्रदायिक कलह वाढेल की काय अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे, ती संधी मिळाली नसती, असेही ते म्हणाले.पुढे बोलताना पवारांनी सांगितलं की, हे संपल्यावर देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि समाजाच्या आरोग्यावर होणार्‍या विपरित परिणामावर विचार केला पाहिजे. जाणकारांनी अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल असं सांगितल आहे. आरबीआयचे माजी गव्हर्नर यांनी सगळ्यात मोठं संकट रोजगारासंबंधी असेल असा इशारा दिला आहे.

रोजगार निर्मितीला तोंडं कसं द्यायचं याचा विचार तज्ञांनी केला पाहिजे. मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांना काही जाणकार लोकांना एकत्र बोलवूया त्यांचा सल्ला घेऊया अशी विनंती केली आहे. त्यांच्याशी बोलून जे काही आर्थिक संकट निर्माण होईल त्यावर चर्चा केली पाहिजे असं मी त्यांनी सांगितलं. त्यांनी ती मान्य केली आहे.आर्थिक संकटासोबत सामना करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना आर्थिक पॅकेज देण्याची गरज आहे. तसंच शेतीला बळ देत मार्गदर्शन केलं पाहिजे. रब्बी हंगाम संपत आला आहे. गहू, तांदूळचं पीक घेण्याची वेळ आली आहे. वेळेवर काढली नाही तर शेती अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, असं पवारांनी यावेळी सांगितलं.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!