Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या राजकीय

राष्ट्रवादीला मुंबईत खिंडार; मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश

Share

मुंबई | प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष व माजी आमदार सचिन अहिर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. मुंबईत यापुढे शिवसेना संघटनासाठी काम करत राहीन अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.

मुंबईतील मातोश्री येथे हा प्रवेश सोहळा पार पडला. याप्रसंगी अहिर यांच्या पत्नी संगीता व राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक याप्रसंगी कार्यकर्ते उपस्थित होते. अहिर यांच्या पक्षांतरामुळे शिवसेनेचे मुंबईतील बळ वाढणार आहे. तर अहिर यांना भायखळामधून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यताही शिवसेनेच्या सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

सचिन अहिर यांनी काल संध्याकाळी त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यादरम्यान, त्यांनी आपल्या भावी वाटचालीची कल्पना दिली होती. परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. आतापर्यंत जशी साथ दिलीत, तशी पुढेही द्या असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना करत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!