Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

सुप्रिया सुळे यांच्याकडून सर्वपक्षीय आमदारांचे स्वागत; अजित पवार, आदित्य ठाकरे, रोहित पवारांची घेतली गळाभेट

Share

मुंबई : प्रतिनिधी

आज सकाळी आठ वाजता विधानभवनाचे काम सुरु झाल्यानंतर एक-एक करत आमदारांना शपथ देण्यात येत आहे. विधानसभेत पहिली शपथ घेण्याचा मान भाजपच्या बबनराव पाचपुते यांना मिळाला. त्यानंतर विजयकुमार गावित, देवेंद्र फडणवीस, दिलीप वळसे, हरीभाऊ बागडे, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, अजित पवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांनी सुरुवातील शपथ घेतली.

विधानभवनाच्या द्वाराजवळ राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वपक्षीय आमदारांचे स्वागत केले. यावेळी नाराज झालेल्या अजित पवार यांची गळाभेट घेत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आणि राष्ट्रावादी सर्वकाही ठीक असल्याचे दाखवून दिले.

दुसरीकडे आमदार रोहित पवार हे पहिल्यांदाच विधानभवनास सदस्यमहणून पोहोचले यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले. सुळे यांनी रोहित पवार यांची गळाभेट घेऊन त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तर सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन विधानभवनात पोहोचलेल्या आदित्य ठाकरे यांचीही सुप्रिया सुळे यांनी गळाभेट घेऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विधान भवनात हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर हे नवनिर्वाचित आमदारांना शपथ देत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!