शेतकरी कर्जमाफी म्हणजे लबाड घरचं जेवण – खा. शरद पवारांची टीका

0
नाशिक (मनीष कटारिया) | कर्ज माफी म्हणजे लबाड घरचं जेवण असून शेतकऱ्यांना आजवर फक्त आशा लावून ठेवली आहे. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना कुठलाही फायदा झालेला दिसून येत नाही. यासह वाढलेली महागाई, नोटबंदी, शेतमालाची बिकट या मुद्यांना अनुसरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी राज्य आणि केंद्रसरकार  चौफेर टीका केली. ते सावरकर नगर येथील नंदनवन लॉन्स येथील शेतकरी अधिवेशनात बोलत होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष अँड. रविंद्र पगार, आमदार जयंत जाधव यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पवार म्हणाले, शेतकरी चळवळीची सुरवात कायम नाशिक पासून होत असते. राज्यात  आणि देशात शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. महागाईने देशात उचांक गाठला आहे.  संपूर्ण जगात पेट्रोल आणि डिझेलचे भाव घसरले  आहे पण भारतात मात्र वाढतेच आहेत.

तेल संदर्भात देशात लूट सुरू असून सर्वसामान्य नागरिक मात्र आता हैराण झालेला आहे. नोट बंदीनंतर देशाची अर्थव्यवस्था उद्वस्थ झाली झाली आहे.

आज शेतीमालाच्या किमतीची अवस्था बिकट झाली आहे. शेतकरी उद्वस्थ झाला तर देश उद्वस्थ होईल देशात हाहाकार माजेल. शेतीमालाच्या कितमी बरोबर खेळणं देशाला परवडणार नसून सरकारने लवकरात लवकर पाऊले  उचलायला हवीत.

आज बळीराजा गप्प आहे उद्या जर शेतकरी रस्त्यावर उतरला तो कुणाच्या बापाला घाबरणार नाही.  नाशिक जिल्हा कृषी प्रधान जिल्हा आहे तरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात याची खंत वाटते.

शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका असे आवाहन यावेळी पवारांनी केले. सरसकट कर्जमाफी देणार असा भाजपाने जाहीरनाम्यात आश्वासन दिले होते. आश्वासन पाळले नाही सरकारची कर्जमाफी म्हणजे लबाड घरचं जेवण म्हणत जोरदार टीकास्र सोडले आहे.

सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कर्जमाफी मुद्द्यावर टीका केली. सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही त्यामुळे सामुदायिक ताकत दाखवण्याची वेळ आली असल्याचे पवार म्हणाले.

आता शेतकऱ्यांची ताकत केंद्र आणि राज्य सरकारला दाखवणार असल्याचे सांगत राष्ट्रवादीने सरकारला अल्टीमेंटम दिला आहे.

येत्या  ५ नोव्हेंबरला होणाऱ्या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरणार असून सरकारला धारेवर धरले जाणार आहे. या बैठकीला शरद पवारदेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*