Type to search

विधानसभेसाठी १० जूनला मतदारसंघाची घोषणा : राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

विधानसभेसाठी १० जूनला मतदारसंघाची घोषणा : राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार

Share
पुणे  :  लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व अंदाज घेऊन विधानसभेसाठी १० जूनला मतदारसंघाची घोषणा करण्यात येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी  जाहीर केले.

रोहित पवार यांनी पुण्यातील हडपसर मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला जात आहे. तर, पवार हे नगरमधील कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास अधिक अनुकूल आहेत.

शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढविल्यानंतर त्यांचे दुसरे नातू रोहित पवार आता विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक आहेत. पवार सध्या राज्यातील दुष्काळी भागाचा दौरा करत आहेत. त्यामुळे, इतर मतदारसंघातून त्यांच्या नावाबाबात चर्चा सुरू झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नगर जिल्ह्यातील अनेक तरुणांनी ‘कर्जत-जामखेड मधून नक्की लढा,’ असा आग्रह धरला, तेव्हा त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला कुणाल गांधी, हर्षवर्धन पवार, ओम कट्टे, मारुती अवरगंड, आकाश झांबरे, ऋषिकेष जगदाळे, तुषार गाडे उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!