Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या राजकीय विधानसभा निवडणूक २०१९

सातारा : भर पावसात शरद पवारांची सभा; मान छत्रपतींच्या गादीला, मत मात्र राष्ट्रवादीला घोषणाबाजी

Share

सातारा | वृत्तसंस्था 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज साताऱ्यात भर पावसात सभा घेत राष्ट्रवादीतून भाजपत बंडखोरी केलेल्या उद्यन राजेंना जोरदार चपराक हाणली. भर पावसातही कार्यकर्ते मान छत्रपतीच्या गादीला मत मात्र राष्ट्रवादीला अशा घोषणा देत होते. भर पावसात पवार सभेत ओले चिंब झाले होते, कार्यकर्तेदेखील पवारांचा जोश बघून जोरजोरात घोषणाबाजी करत होते. संपूर्ण व्यासपिठावरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी पवारांचा आक्रमकपणा बघून अवाक झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज यांनी साताऱ्यामध्ये पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतली. या सभेमध्ये पवारांचं भाषण सुरू असताना अचानक वरूणराजाने हजेरी लावली.

धो-धो कोसळणाऱ्या पावसात पवारांनी भाषण करण्यास सुरुवात केली. ‘राज्यात जनता २१ तारखेला महाराष्ट्रात चमत्कार करणार आहे. एखाद्या माणसाकडून चूक झाली, तर ती चूक कबूल करायची असते. लोकसभेच्या उमेदवार निवडीमध्ये माझ्याकडून चूक झाली, हे मी जाहीरपणे कबूल करतो’असे म्हणत शरद पवार यांनी उद्यनराजे यांच्यावर हल्लाबोल केला.

साताऱ्यात पंतप्रधान, मुख्यमंत्री येऊन सभा घेऊन गेले. मुख्यमंत्री म्हणतात राज्यात कोणी पहिलवान नाही पण मी सांगेल याच तालुक्यातील अनेक पहिलवान आमच्या सोबत आहेत. ते तुम्हाला जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत.

या निवडणुकीत ज्या दिवशी तुम्हाला मत द्यायची संधी मिळेल, त्या निवडणुकीचा निकाल संपूर्ण महाराष्ट्राला कळेल. सातारा जिल्हा विचाराचा आणि मताचा पक्का आहे. शिवाजी महाराजांचे विचार खऱ्या अर्थाने जपणारा असल्यामुळे बंडखोरांना हा जिल्हा धडा दाखवल्याशिवाय राहणार नाही असेही पवार याप्रसंगी म्हणाले.

 

सातारा येथील सभेचे थेट प्रक्षेपण…

#सातारा लोकसभा मतदारासंघाच्या पोटनिवडणूकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील आणि विधानसभा मतदारसंघातील संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार दिपक पवार यांच्या प्रचारार्थ सभा…याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. Sharad Pawar आणि आ. Shashikant Shinde यांच्या प्रमुख उपस्थितीत सभेचे थेट प्रक्षेपण…

Posted by Nationalist Congress Party – NCP on Friday, 18 October 2019

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!