Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या राजकीय

माजी आमदार कोकाटे यांना राष्ट्रवादी प्रवेशाचे आवतन

Share

सिन्नर | अजित देसाई

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आज (दि.16) झालेल्या निर्धार परिवर्तन सभेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना राष्ट्रवादी प्रवेशाचे खुले निमंत्रण दिले.

माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे चेले असणारे कोकाटे यांना राष्ट्रवादी दूरची नाही. तुम्ही पक्षात या असे जाहीर निमंत्रणच एका प्रकारे आव्हाड यांनी पक्षाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या साक्षीने दिले.

तुम्ही राष्ट्रवादीत आलात तर तुमचा फायदा होईल असेही आव्हाड कोकाटे यांना उद्देशून म्हणाले. आव्हाड यांच्या या वक्तव्यामुळे सिन्नरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे, शिवसेना, काँग्रेस असा प्रवास करून गेली विधानसभा भाजपकडून लढवणारे कोकाटे सेना भाजपची युती झाली तर पुढे काय निर्णय घेणार याबाबत तर्क वितर्क असताना त्यांना राष्ट्रवादीकडून जाहीररित्या निमंत्रण मिळाले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!