Type to search

Featured maharashtra

मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीचे तीन उमेदवार – जयंत पाटील

Share

निष्ठावंतांवर भाजपा-सेनेने रोडरोलर फिरवला

पुणे (प्रतिनिधी) – मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीकडून देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे असे दोन चेहरे पुढे आले आहेत. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांचे नावही समोर आणले जात आहे. सत्ताधाऱयांनी कुठला तरी एक चेहरा पुढे करावा, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत लगावला. पक्षातील निष्ठावंतांवर भाजपा-सेनेने रोडरोलर फिरवला असून,त्यांचेही अनेक लोक आमच्या संपर्कात असल्याचा दावाही पाटील यांनी या वेळी केला.
पाटील म्हणाले, 220 मतदारसंघात युतीचे उमेदवार सध्या पुढे आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.

पण शिवसेनेला भाजपचा मुख्यमंत्री मान्यच नाही. प्रशांत किशोर हे शिवसेनेचे मार्गदर्शक असल्याने त्यांचीच ही रणनीती आहे.म्हणून त्यांनी आता आदित्य ठाकरे यांचा चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी समोर आणला आहे.मुख्यमंत्रिपदावरून सेना-भाजप एकमेकांमध्ये भांडणार.म्हणजे लोकांमध्ये यांच्यातच स्पर्धा सुरू आहे, असे चित्र उभे राहावे. काँग्रेस-राष्ट्रवादीतून अनेक पुढारी भाजप-शिवसेनेत जात आहेत. खरेतर सत्ताधाऱयांनी आत्मविश्वास गमावला आहे. त्यामुळे त्यांना इतर पक्षातील नेत्यांची गरज भासत आहे. पक्षातील निष्ठावंतांना त्यांनी डावलले असून, ते आमच्या संपर्कात आहेत. चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला येणाऱया विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्येकी दहा जागा दिल्या आहेत. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. सत्ताधाऱयांना सत्तेची मस्ती आली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

प्रकाश आंबेडकरांना पत्र पाठवले, तर मनसेबाबत चर्चा करणार
काँग्रेससोबत आमची जागावाटपाबाबतची चर्चा सुरू आहे. यात 220 ते 230जागांबाबत चर्चा झाली.ऑगस्ट अखेरपर्यंत जागावाटपाबाबतचे सर्व प्रश्न सुटतील, असे वाटते आहे.त्यानंतर मित्रपक्षाबाबत आम्ही दोघे आधी आमच्यात चर्चा करून मगच त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. प्रकाश आंबेडकरांना राष्ट्रवादीकडून मी आणि काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांनी एकत्रित पत्र पाठवून कळवले आहे. जातीयवादी शक्तांविरोधात सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. असे त्यांना यात सांगितले आहे. ते येतील असे वाटते. पण, मनसेबाबत मात्र आमच्यात चर्चा झालेली नाही. त्यांच्याबाबत आम्ही एकत्रित चर्चा करून मगच निर्णय घेण्यात येईल.

महाराष्ट्रातील 288 जागांबाबत पवारांशी चर्चा
महाराष्ट्रातील 288 जागांबाबत पक्षातील सर्व नेत्यांची पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत तपशीलवार चर्चा आज झाली. यामध्ये सर्व इच्छुक उमेदवारांचे अर्ज राज्यातील वेगवेगळ्या जिह्यातून मागवले होते.साधारणतः 800 अर्ज आले आहेत. परंतु यात काँग्रेस ज्या ठिकाणी आहे, तेथून त्या जागांवरून फारच कमी अर्ज आले आहेत. येत्या 23, 24, 25 जुलैला पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते वेगवेगळ्या भागात जाऊन तेथे उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. मी स्वतः पुणे आणि ठाणे हे भाग मोठे असल्याने तेथे मुलाखती घेईन,असे पाटील यांनी या वेळी नमूद केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!