Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : माजी खा. पिंगळे ‘एसीबी’ कार्यालयात दाखल

Share

नाशिक  | प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी खासदार देविदास पिंगळे चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी)कार्यालयात दाखल झाले आहेत. नाशिक बाजार समितीच्या भ्रष्टाचार प्रकरणी पिंगळे यांची चौकशी सुरू असल्याची माहिती  सूत्रांकडून मिळत आहे.

पिंगळे हे राष्ट्रवादीचे मोठे नेते, माजी खासदार आणि नाशिक बाजार समितीचे माजी सभापती आहेत. त्यांच्यावर कर्मचाऱ्यांचे वेतन, दिवाळी बोनस, भविष्य निर्वाह निधीचा अपहार केल्याचा आरोप आहे. दरम्यान, याच काळात जवळपास ५७ लाख रुपये बेहिशोबी रोकड एका वाहनात कर्मचाऱ्याकडे आढळून आल्याचीही घटना घडली होती.

त्यानंतर माजी खा. पिंगळे यांच्यावर म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.  पिंगळे यांच्या घराची, फार्म हाऊसची आणि बँकेच्या लॉकर्सची झडती त्यावेळी घेण्यात आली होती.

दरम्यान, याच चौकशीचा भाग म्हणून त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीसाठी आणण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!